सिद्धार्थ फाउंडेशनचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा १४ फेब्रुवारीला; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
सिद्धार्थ फाउंडेशनचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा १४ फेब्रुवारीला; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
पिंपरी-चिंचवड | वंदे भारत न्यूज एक्सप्रेस
पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सिद्धार्थ फाउंडेशन व एज्युकेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ २०२५–२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सिद्धार्थ कोचिंग अकॅडमी व अबॅकस सेंटर, रुपीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि पी.एम.आर.डी.ए.चे लेखाधिकारी विजय बोलेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. सचिव शांताराम डी. भालेकर राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती
शिवानी नरळे (नगरसेविका)
प्रवीण भालेकर (नगरसेवक)
शीतल वर्णेकर (नगरसेविका)
पंकज भालेकर (नगरसेवक)
डॉ. स्वप्नील गोसावी (एम.डी., चेस्ट फिजिशियन)
रवींद्र घोरपडे (सैनिक, इंडियन आर्मी)
औदुंबर पाडुळे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ)
कैलास साळवे (मुख्य संपादक, बेधडक टाईम्स)
गणेश इधाटे (संचालक, स्वराज्य एंटरप्रायजेस, निगडी)
प्रविण शेंडे (सैनिक, इंडियन आर्मी)
अभिजित देवकाते (संचालक, इंद्रायणी इन्फोटेक)
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अबॅकस स्पर्धांतील यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ४.०० वाजता श्री कृष्ण मंदिर कॉन्फरन्स हॉल, भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजक व पदाधिकारी
जयवंत लादे (संस्थापक अध्यक्ष, सिद्धार्थ फाउंडेशन)
मयुरी लादे (सल्लागार, सिद्धार्थ फाउंडेशन)
सुरेश अर्जुन (सचिव, सिद्धार्थ फाउंडेशन)
रेखा अर्जुन (उपाध्यक्ष, सिद्धार्थ फाउंडेशन)
विजय जाधव (शिक्षक प्रतिनिधी)
अंजनीकुमार कुंभार (कार्यकर्ता, सिद्धार्थ फाउंडेशन)
पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




