ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रायगड किल्लावरील रोपवे दुरुस्तीसाठी सहा दिवस बंद


रायगड किल्लावरील रोपवे दुरुस्तीसाठी सहा दिवस बंद

महाड, प्रतिनिधी:

     छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या रायगड किल्लावरील रोपवे सेवा वार्षिक तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सहा दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

रायगड रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खाडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षी तांत्रिक तपासणी आणि देखभाल करणे आवश्यक असते. त्यामुळे या कालावधीत कोणतीही प्रवासी वाहतूक केली जाणार नाही.

वृद्ध, अपंग तसेच लहान मुलांसह येणाऱ्या पर्यटकांसाठी रोपवे ही महत्त्वाची सुविधा असून, वर्षभर हजारो शिवभक्त आणि पर्यटक या माध्यमातून किल्ल्याचे दर्शन घेतात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

१ मार्च २०२६ पासून रोपवे सेवा पुन्हा नियमितपणे सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून पर्यटकांनी भेटीचे नियोजन करताना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *