ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीमहानगरपालिकावाणिज्य

निगडी यमुनानगर येथे अधिकृत आधार सेवा केंद्र सुरू; नागरिकांना मोठा दिलासा


निगडी यमुनानगर येथे अधिकृत आधार सेवा केंद्र सुरू; नागरिकांना मोठा दिलासा

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र स्टेट्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अधिकृत मान्यतेने निगडी परिसरात नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र आरोग्य विभाग कार्यालयाजवळ, शनी मंदिराशेजारी, यमुनानगर येथे सुरु आहे, सेक्टर २२, निगडी गावठाण साईनाथ नगर, यमुनानगर,रुपीनगर, चिखली, निगडी प्राधिकरण, आकुर्डी येथील येथे नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध झाले आहे.

या अधिकृत केंद्रात नवीन आधार नोंदणी, पत्ता बदल, मोबाईल नंबर अपडेट, जन्मतारीख दुरुस्ती, बायोमेट्रिक अद्ययावत करणे आदी सेवा शासनाच्या नियमानुसार पारदर्शक पद्धतीने दिल्या जात आहेत. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, थेरगाव तसेच आसपासच्या भागातील नागरिकांना आता आधारसंबंधित कामांसाठी दूरवर जाण्याची गरज उरणार नाही. स्थानिक स्तरावरच सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

आधार सेवा केंद्र चालक गणेश इधाटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,

स्थानिक नागरिकांसाठी हे केंद्र मोठा दिलासा ठरत असून प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *