ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीशिक्षण

सिद्धार्थ फौंडेशन व एज्युकेशन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश


सिद्धार्थ फौंडेशन व एज्युकेशन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

पिंपरी : सिद्धार्थ कोचिंग अकॅडमी, रुपीनगर येथील विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

या परीक्षेत ओम खोसे आणि प्रथमेश बांबल यांनी प्रत्येकी ९७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सुषांत ओव्हाळ याने ९५.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे रुपीनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सिद्धार्थ फाउंडेशन व एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक जयवंत लादे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळविल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

फोटो ओळ : सिद्धार्थ कोचिंग अकॅडमी, रुपीनगर येथील गुणवंत विद्यार्थी ओम खोसे, प्रथमेश बांबल व सुषांत ओव्हाळ.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *