ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सुनेत्रा पवारांचा राजीनामा; बारामती विजयांनंतर मोठा निर्णय


सुनेत्रा पवारांचा  राजीनामा; बारामती विजयांनंतर मोठा निर्णय

विक्रमी मताधिक्याने आमदार झाल्यानंतर संसद सदस्यत्वाचा त्याग; राज्याच्या राजकारणात नवा टप्पा

वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | मुंबई/बारामती

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देत मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी औपचारिकरीत्या आपला राजीनामा सादर केला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर त्यांनी आमदार म्हणून काम करण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदासह महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात उतरत बारामतीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघात पूर्वी १ लाख ६५ हजार मताधिक्याचा विक्रम नोंदवला गेला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी तब्बल १,१८,९३० मतांच्या फरकाने विजय मिळवत नवा इतिहास घडवला.

या विजयामुळे बारामतीत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळत आनंद साजरा केला. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *