ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

जयंतीदिनी सुनेत्रा पवार भावुक; ‘दादा, तुमच्या आठवणी प्रत्येक श्वासात जिवंत राहतील’


जयंतीदिनी सुनेत्रा पवार भावुक; ‘दादा, तुमच्या आठवणी प्रत्येक श्वासात जिवंत राहतील’

पुणे | प्रतिनिधी | दि. २२ जुलै २०२६

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टमधून त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्यावरील प्रेम, जिव्हाळा आणि त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली भावनिक पोकळी शब्दबद्ध केली आहे.

“एवढी वर्षे तुमचा वाढदिवस आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. मात्र आज त्याच दिवसाला ‘जयंती’ म्हणून साजरे करताना मन आतून तुटून जाते. हे कटू सत्य स्वीकारायला मन आजही तयार नाही,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्व. अजितदादा पवार यांनी दिलेला आधार, कठीण प्रसंगी मिळालेली साथ आणि त्यांच्या विश्वासामुळेच अनेक आव्हानांना सामोरे जाता आले, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. काळाने आयुष्यातील सर्वात मोठा आधार हिरावून घेतल्याची वेदनाही त्यांनी व्यक्त केली.

“तुम्ही आज आमच्यात शारीरिकदृष्ट्या नसला तरी तुमचे विचार, लोकांप्रती असलेला सेवाभाव, शिस्त, कार्यपद्धती आणि दिलेले प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील,” असे म्हणत त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले.

सुनेत्रा पवार यांच्या या भावनिक पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया देत स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि स्मृतींना आदरांजली वाहिली. जयंतीदिनी व्यक्त झालेल्या या भावना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या ठरल्या.

– वंदे भारत न्यूज एक्सप्रेस


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *