पुणे / पीसीएमसीमनोरंजन

संघर्षातून घडलेला उद्योगविश्वातील वटवृक्ष उद्योजक गजानन भाऊ वाघमोडे यांचा प्रेरणादायी प्रवास


 

संघर्षातून घडलेला उद्योगविश्वातील वटवृक्ष

उद्योजक गजानन भाऊ वाघमोडे यांचा प्रेरणादायी प्रवास

पिंपरी-चिंचवड : बारामती तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या गजानन भाऊ वाघमोडे यांनी जिद्द, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर उद्योगविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, रुपीनगरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.

आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहर गाठले. एका छोट्या कंपनीत नोकरी करत असताना मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला. आज तळवडे, चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात त्यांचे विविध औद्योगिक प्रकल्प कार्यरत असून शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

उद्योग क्षेत्रातील यशाबरोबरच समाजकारणातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी धनगर समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. संत बाळूमामा मंदिर उभारणी, विविध सामाजिक उपक्रम तसेच नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत त्यांनी समाजकार्याशी असलेली नाळ अधिक घट्ट केली आहे.

शांत, संयमी, मितभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व ही त्यांची ओळख आहे. उद्योग आणि समाजकारणाचा सुंदर समतोल साधत त्यांनी अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

गजानन भाऊ वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– अभिष्टचिंतन विशेष | वंदे भारत न्यूज एक्सप्रेस


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *