क्रीडाताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीमनोरंजन

रुपीनगर व्यापारी असोसिएशनकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन


रुपीनगर व्यापारी असोसिएशनकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन; शिवजयंती उत्साहात साजरी

रुपीनगर, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुपीनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने उत्साहात अभिवादन व जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी एकत्र येत शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच शिवराज्याच्या विचारांचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद नवले, उपाध्यक्ष सुखदेव मस्के, जेष्ठ नेते सुखदेव नरळे, उद्योजक संजय लोकरे, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश भालेकर, उद्योजक सोमनाथ मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते बळीराम कंठाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिवरायांच्या पराक्रम, न्यायनिष्ठा आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरव केला. समाजात एकात्मता, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासण्यासाठी शिवरायांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *