गुणवंतांचा जल्लोष! सिद्धार्थ फाउंडेशनचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
गुणवंतांचा जल्लोष! सिद्धार्थ फाउंडेशनचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस | पिंपरी चिंचवड
रुपीनगर येथील सिद्धार्थ फाउंडेशन व एज्युकेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सिद्धार्थ कोचिंग अकॅडमी व अबॅकस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अबॅकस स्पर्धांतील उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि पी.एम.आर.डी.ए.चे लेखाधिकारी विजय बोलेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शांताराम डी. भालेकर होते.
प्रमुख उपस्थितीत शिवानी नरळे (नगरसेविका), प्रवीण भालेकर (नगरसेवक), शीतल वर्णेकर (नगरसेविका), पंकज भालेकर (नगरसेवक), डॉ. स्वप्नील गोसावी (एम.डी., चेस्ट फिजिशियन), रवींद्र घोरपडे (सैनिक, इंडियन आर्मी), औदुंबर पाडुळे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ), कैलास साळवे (मुख्य संपादक, बेधडक टाईम्स), गणेश इधाटे (संचालक, स्वराज्य एंटरप्रायजेस), प्रविण शेंडे (सैनिक, इंडियन आर्मी), अभिजित देवकाते (संचालक, इंद्रायणी इन्फोटेक) तसेच सी. पी. शशीधरण (अध्यक्ष, श्री कृष्ण चॅरिटेबल फाउंडेशन) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन जयवंत लादे (संस्थापक अध्यक्ष), मयुरी लादे (संचालिका), विजय जाधव (शिक्षक प्रतिनिधी), सुरेश अर्जुन (सचिव), रेणुका अर्जुन (उपाध्यक्ष) आणि अंजनीकुमार कुमार (कार्याध्यक्ष) यांनी केले.
सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.





