ताज्या घडामोडीदेशपुणे / पीसीएमसीराजकीय

रुपीनगर-तळवडे-त्रिवेणी नगर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मन की बात Live कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


रुपीनगर-तळवडे-त्रिवेणी नगर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मन की बात Live कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | वंदे भारत न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या ‘मन की बात’ या मासिक संवाद कार्यक्रमाचे रविवारी दि. २२ रोजी थेट प्रक्षेपण करण्यात आले. प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर-तळवडे-त्रिवेणी नगर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम सामूहिकरित्या ऐकला.

कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर यांच्या संपर्क कार्यालयात लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली.

बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी एकत्र येत कार्यक्रमाचे श्रवण केले.

कार्यक्रमानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या वेळी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर, यमुनानगर-तळवडे मंडल अध्यक्ष रामदास कुटे, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत पतंगे, उद्योजक चंद्रशेखर कडलग युवा मोर्चा मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर तसेच संदीप भालेकर, सागर भालेकर, दत्ता बंदावणे, अजित भालेकर, सचिन चव्हाण, दिगंबर भालेकर, राकेश भालेकर, प्रवीण पोकळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी भालेकर, गणेश भालेकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सामाजिक, पर्यावरणीय, नवोपक्रम, युवक सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्मितीशी संबंधित विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी कार्यक्रम गांभीर्याने ऐकून त्यातील मुद्द्यांवर चर्चा करत समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *