ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीसामाजिक

तळवडे येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ‘धर्मवीर बलिदान मास’ उपक्रम


तळवडे येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ‘धर्मवीर बलिदान मास’ उपक्रम

पिंपरी-चिंचवड : धर्मासाठी, देशासाठी आणि स्वाभिमानासाठी अतुलनीय बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ तळवडे येथे ‘धर्मवीर बलिदान मास’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कपटाने पकडण्यात आल्यानंतर तब्बल ४० दिवस अमानुष छळ सहन करून त्यांनी प्राणार्पण केले. त्यांच्या या बलिदानाची आठवण जागी ठेवण्यासाठी हा मास साजरा केला जाणार आहे.

हा उपक्रम १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत दररोज संध्याकाळी ८:०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ श्री शिवतिर्थ तळवडे चौक असे आहे. या काळात दररोज श्रद्धांजली, इतिहासपर माहिती, सामूहिक घोषवाक्ये आणि प्रेरणादायी विचार यांद्वारे धर्मवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे.

“वढूची चिता धगधगे हृदयांत नित्य…” या ओळींतून त्यांच्या बलिदानाची जाज्वल्य आठवण जिवंत ठेवण्याचा संदेश आयोजकांनी दिला आहे. उपस्थितांनी सफेद वारकरी टोपी परिधान करून कार्यक्रमास यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीरांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *