ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षण

पै.अनिकेतभाऊ घुले यांच्या पुढाकारातून ‘V.I.P. MEGA YLTP’ युवक नेतृत्व शिबिराचे आयोजन


पै.अनिकेतभाऊ घुले यांच्या पुढाकारातून ‘V.I.P. MEGA YLTP’ युवक नेतृत्व शिबिराचे आयोजन

“१,००,००० युवक घडविण्याचा संकल्प”

पुणे : ‘V.I.P. MEGA YLTP (कर्मयोग शिबिर)’ या विशेष युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिवभक्त पै. अनिकेतभाऊ घुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निवासी ७ दिवसीय उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे शिबिर १० ते १७ मार्च २०२६ या कालावधीत येथे पार पडणार असून १० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता रिपोर्टिंग ठेवण्यात आली आहे. शिबिरासाठी सहभागी युवकांच्या निवास व प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

या शिबिरात नेतृत्व कौशल्य, प्रभावी संभाषण कौशल्य, आयोजन व व्यवस्थापन तंत्र, संकल्प व कर्मयोगाचे तत्त्वज्ञान, आत्मविश्वास वृद्धी, तणाव व भीतीमुक्त जीवन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया ध्यान यांचा समावेश असलेली विशेष सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत.

प्रशिक्षक म्हणून मास्टर ट्रेनर बिपिन भैय्या घाडगे आणि त्यांची टीम युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. “१,००,००० युवक घडविण्याचा संकल्प” या ध्येयाने प्रेरित होऊन अधिकाधिक युवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक शिवभक्त अनिकेतभाऊ घुले यांनी केले आहे.

नोंदणीसाठी aolt.in/954108 या लिंकवर अर्ज करता येणार असून अधिक माहितीसाठी 7410575733 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *