ग्रामीणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ लागू; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा


राज्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ लागू; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा

मुबंई प्रतिनिधी : राज्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि शेतीला चालना मिळावी, या उद्देशाने ही योजना लागू करण्यात येत आहे. सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाचा यात समावेश करण्यात येणार आहे.

योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज या कर्जमाफीसाठी पात्र मानले जाणार आहे. सरकार लवकरच या योजनेचे सविस्तर निकष आणि अर्ज प्रक्रिया जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, केवळ थकीत कर्जदारांनाच नाही तर कर्ज नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *