पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या मोठ्या मिरवणुका; भोसरी, चिखली, चाकणमधील प्रमुख रस्ते बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या मोठ्या मिरवणुका; भोसरी, चिखली, चाकणमधील प्रमुख रस्ते बंद
पिंपरी-चिंचवड : उद्या (दि. २६ मार्च) शहरातील विविध भागांत भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळं पिंपरी चिंचवड मध्ये दिवसभर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत काही प्रमुख मार्गांवर निर्बंध लागू केले आहेत.
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या माहितीनुसार खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
📍 भोसरी परिसर
हरिओम स्वीट चौक ते दिघी रोड आणि दिघी चौक ते दिघी रोड हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. या भागातील वाहतूक आळंदी रोडमार्गे वळवण्यात येणार आहे.
📍 चिखली / मोशी परिसर
Pune-Nashik Highwayवरून मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कुदळवस्तीकडे जाणारी वाहतूक बंद असेल. वाहनचालकांनी भारतमाता चौक हा पर्यायी मार्ग वापरावा.
📍 चाकण परिसर
चाकण चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक, आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक परिस्थितीनुसार वळवण्यात येईल. येथे मोठी गर्दी अपेक्षित आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे. मात्र इतर सर्व खाजगी व सार्वजनिक वाहनांना बंद मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





