श्री घोरवडेश्वर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव; महापूजा, हवन व महाप्रसादाचे आयोजन
श्री घोरवडेश्वर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव; महापूजा, हवन व महाप्रसादाचे आयोजन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
घोरवडेश्वर परिसरातील शिवभक्तांसाठी गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री घोरवडेश्वर गोरक्षनाथ सेवा ट्रस्ट यांच्या वतीने महापूजा, रुद्राभिषेक, होम-हवन, समाधी पूजन, गुरुपादुका पूजन तसेच महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५.३० वाजता श्री घोरवडेश्वर मंदिरात रुद्राभिषेक व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजता होम-हवन होणार आहे. सकाळी १० ते ११.३० या वेळेत सद्गुरू ब्रह्मीभूत महादेव बाबा राऊत व ब्रह्मीभूत हनुमंत बाबा बोडके यांच्या समाधी पूजनासह गुरुपादुका पूजनाचा धार्मिक विधी पार पडणार आहे.
दुपारी १२ वाजल्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद व अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होईल. या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन गुरूंचे आशीर्वाद व अन्नप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
— वंदे भारत न्यूज एक्सप्रेस





