आरोग्यताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसीसामाजिक


डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये महास्वच्छता अभियान

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या महास्वच्छता अभियानासाठी हजारो श्रीसदस्य सज्ज.

प्रतिनिधी | पिंपरी-चिंचवड | 

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी (दि. १ मार्च) सकाळी ८.०० वाजता पिंपरी-चिंचवड शहरात भव्य महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे स्वच्छतादूत ‘पद्मश्री’ सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

प्रतिष्ठान हे सेवादायी व समाजाभिमुख उपक्रम राबविणारे अग्रगण्य संस्थान असून, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या अभियानात प्रतिष्ठानचे हजारो श्रीसदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत.

या भागांमध्ये होणार स्वच्छता मोहीम

महास्वच्छता अभियानांतर्गत निगडी, चिंचवड, थेरगाव व परिसरातील पुढील भागांमध्ये स्वच्छता केली जाणार आहे –

सिद्धिविनायक नगरी ते भक्ती-शक्ती चौक

म्हाळसाकांत चौक ते खंडोबा माळ चौक

म्हाळसाकांत चौक ते सेंट उर्सुला शाळा

पिंपरी स्मशानभूमी ते चाफेकर चौक

त्रिवेणी चौक ते भक्ती-शक्ती

वाल्हेकरवाडी ते चाफेकर चौक

शाहूनगर व कृष्णानगर परिसर

डीमार्ट थेरगाव ते धनगर बाबा मंदिर, काळेवाडी

धनगर बाबा मंदिर ते काळेवाडी फाटा

काळेवाडी फाटा ते डांगे चौक

तापकीर चौक ते बारणे कॉर्नर, थेरगाव

डांगे चौक ते मोरया गोसावी परिसर, चिंचवड

काळेवाडी डीमार्ट ते चाफेकर चौक

या मोहिमेसाठी आवश्यक साधनसामग्री तसेच सहभागी श्रीसदस्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व हातमोजे प्रतिष्ठानतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत सातत्याने स्वच्छता उपक्रम राबवत असून, या महास्वच्छता अभियानामुळे महानगरपालिकेच्या प्रयत्नांना निश्चितच मोलाची साथ मिळणार आहे.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्रासह देश-विदेशात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, विहिरींची स्वच्छता, जलपुनर्भरण, धरण व तलावातील गाळ काढणे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, रक्तदान व प्लाज्मादान शिबिरे तसेच थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांसाठी मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे प्रतिष्ठान समाजकार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *