ताज्या घडामोडीपुणे / पीसीएमसी

निगडीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत


निगडीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

निगडी : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निगडी येथील श्री खंडोबा मंदिरात भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

एकादशीच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता मंदिरातील शंकराच्या पिंडीस तसेच खंडोबाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकडा आरती झाली. सकाळी ९ वाजता चकरेश्वर महिला भजनी मंडळाची भजन सेवा पार पडली.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मंदिराबाहेरील रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांची सजावट करण्यात आली. फुलांच्या पाकळ्यांवरून पालखी रथ मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपाखाली आणून उभा करण्यात आला. त्यानंतर ॲड. धनश्री आकाश काळभोर, आकाश तानाजी काळभोर तसेच जयदीप खापरे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले.

 

खंडोबा देवस्थान, व्यापारी तसेच परिसरातील भाविकांच्या योगदानातून खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

 

यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला राजेंद्र बाबर, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अर्चना अक्षय करांडे, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका शैलजा मोरे, माजी नगरसेवक सचिन चिखले, माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, विजय आण्णा जगताप, इंद्रसिंग राजपूत, सुधीर ढगे यांच्यासह पालखी सोहळ्याचे प्रमुख उमेश महाराज मोरे, माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त सुनील महाराज मोरे उपस्थित होते.

पालखी सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे, चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव, म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यासह पोलिस प्रशासनाने सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष तानाजी काळभोर, उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, खजिनदार जंगलीमहाराज काळभोर, सचिव भाऊसाहेब काळभोर, कार्याध्यक्ष शंकर आप्पा काळभोर, विश्वस्त ॲड. राजेंद्र काळभोर, राजेंद्र ल. काळभोर, दीपक काळभोर, दिलीप काळभोर, चेतन काळभोर, गणेश काळभोर तसेच निगडी ग्रामस्थांनी केले.

पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *