वाणिज्य वार्ता : रिअल इस्टेट क्षेत्रात ‘जगदगुरु प्रोजेक्ट्स’चा विश्वासार्ह ठसा

वाणिज्य वार्ता : रिअल इस्टेट क्षेत्रात ‘जगदगुरु प्रोजेक्ट्स’चा विश्वासार्ह ठसा
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस नेटवर्क
पिंपरी चिंचवड :
रिअल इस्टेट क्षेत्रात गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक सेवा देणारी ‘जगदगुरु प्रोजेक्ट्स’ ही संस्था गुंतवणूकदार व जमीनमालकांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास येत आहे. लेआउट व लँड डेव्हलपमेंटपासून ते निवासी, औद्योगिक व व्यावसायिक प्रकल्पांपर्यंत संपूर्ण रिअल इस्टेट डेव्हलपमेंट सोल्यूशन कंपनीकडून पुरवले जात आहे.
जगदगुरु प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून बिल्ट टू सूट (BTS) प्रकल्प, जॉइंट व्हेंचर, पुनर्विकास (री-डेव्हलपमेंट) प्रकल्प, तसेच प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग्स व सिव्हिल कन्स्ट्रक्शन या सेवा कार्यक्षम व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी टीम आणि पारदर्शक व्यवहार ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.
संस्थेचे संचालक अजय काशिनाथ साठे यांनी सांगितले की, “गुंतवणूकदार आणि जमीनमालक यांना दीर्घकालीन फायदा होईल अशा प्रकल्पांवर आमचा भर असून वेळेत आणि दर्जेदार काम देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
तळवडे येथील कार्यालयातून कार्यरत असलेली ही संस्था स्थानिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील विकासाला चालना देत असून गुंतवणूकदार व जमीनमालकांसाठी खुले निमंत्रण देण्यात आले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात सुरक्षित गुंतवणूक व नियोजनबद्ध विकासासाठी जगदगुरु प्रोजेक्ट्स हे नाव वेगाने विश्वास संपादन करत आहे.




