शिवयोद्धा प्रतिष्ठाणतर्फे रुपीनगरात भव्य शिवजयंती उत्सव; ढोल पथक व शिवचरित्र कीर्तनाचा संगम
शिवयोद्धा प्रतिष्ठाणतर्फे रुपीनगरात भव्य शिवजयंती उत्सव; ढोल पथक व शिवचरित्र कीर्तनाचा संगम
पिंपरी चिंचवड : छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा आणि हिंदवी स्वराज्याचा जागर करण्यासाठी शिवयोद्धा प्रतिष्ठाण यांच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी रुपीनगर परिसरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवप्रेमींमध्ये आधीच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायंकाळी ६ ते ७ या वेळेत शिवयोद्धा ढोल पथकाच्या दमदार तालावर शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर सायं. ७ ते १० या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कबीर महाराज आस्तार यांचे शिवचरित्रावरील प्रेरणादायी कीर्तन होणार आहे. या कीर्तनातून छत्रपतींचे पराक्रम, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम क्रांतीज्योत मित्र मंडळ, भालेकर चौक, रुपीनगर पोलिस चौकी शेजारी येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे संयोजक अमोल तुकाराम भालेकर (अध्यक्ष, शिवयोद्धा प्रतिष्ठाण) असून त्यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने परिसरात भगव्या पताका, रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे.
छत्रपतींच्या विचारांचा जागर आणि स्वराज्याचा संदेश देणारा हा सोहळा शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.





