अपघातग्रामीणपुणे / पीसीएमसी

शिवज्योत आणण्यासाठी निघाले आणि काळाने गाठले; मावळात भीषण अपघातात २ शिवभक्तांचा मृत्यू 


शिवज्योत आणण्यासाठी निघाले आणि काळाने गाठले; मावळात भीषण अपघातात २ शिवभक्तांचा मृत्यू 

पुणे: मावळतालुक्यातील  कामशेतजवळ हिरकणी रिसॉर्ट समोर पहाटे सुमारे ०१.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव स्विफ्ट कारने डीव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्यानंतर मागील दुचाकीला धडक बसल्याने दोन शिवभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार (MH-१४ / JA-५१११) ही लोणावळा येथून पुण्याकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून कारने रस्त्यावरील डीव्हायडर तोडला. त्यानंतर पुण्याहून लोणावळ्याकडे येणाऱ्या एर्टिगा कारला (MH-१४ / MV-२२९४) जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मागून येणाऱ्या दुचाकीला (MH-१४ / GV-५१७३) धडक बसली.

या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. मृतांची नावे ओंकार दत्तात्रय आरडे (वय २२ वर्षे) आणि दर्शन बाळू शिंदे (वय १५ वर्षे) अशी असून दोघेही वडेश्वर, ता. मावळ येथील रहिवासी आहेत. जखमी अवस्थेत त्यांना पवना हॉस्पिटल येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे दोघेही युवक विसापूर, लोणावळा येथे शिवज्योत आणण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.

दरम्यान, स्विफ्ट कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

या प्रकरणी अधिक तपास कामशेत पोलीस करत आहेत.  या दुर्दैवी घटनेमुळे मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *