संत तुकाराम महाराज बीज उत्साहात; निगडीतील भक्ती शक्ती समूहशिल्पास महापौर, उपमहापौरांकडून अभिवादन
संत तुकाराम महाराज बीज उत्साहात; निगडीतील भक्ती शक्ती समूहशिल्पास महापौर, उपमहापौरांकडून अभिवादन
निगडी | प्रतिनिधी
संत तुकाराम बीज दिनानिमित्त निगडी येथील भक्ती-शक्ती परिसरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्र बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसेवक अमित गावडे तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून वंदन केले. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून समाजाला भक्ती, समता आणि सदाचाराचा संदेश दिला असून त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते, असे यावेळी नमूद करण्यात आले.
(वंदे भारत न्यूज एक्सप्रेस) 📰





