तात्काळ राजीनामा द्या; मुख्यमंत्र्यांचे रुपाली चाकणकरांना आदेश?
तात्काळ राजीनामा द्या; मुख्यमंत्र्यांचे रुपाली चाकणकरांना आदेश?
वंदे भारत न्यूज एक्सप्रेस नेटवर्क
मुंबई/नाशिक : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे मौखिक आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडील काही प्रशासकीय व राजकीय घडामोडींमुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः नाशिक येथील काही प्रकरणांवरून वरिष्ठ पातळीवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. या संदर्भात अशोक खरात यांचे नावही चर्चेत आले असून, संबंधित घडामोडींशी त्यांचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान, नाशिकमधील राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, लवकरच याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी अधिकृत निवेदन येणे बाकी असून, राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे





