“मोठंमोठे गार केले गंमत मधी…”; सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर टोला
“मोठंमोठे गार केले गंमत मधी…”; सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर टोला
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट)च्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. “मोठंमोठे गार केले गंमत मधी…” असा उपरोधिक उल्लेख करत अंधारे यांनी सोशल मीडियावरून चाकणकरांना डिवचल्याची चर्चा रंगली आहे.
राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करत अंधारे यांनी फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीका करत नैतिक जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या या उपरोधिक शैलीमुळे वातावरण अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अंधारे यांच्या या टोलेबाज वक्तव्यामुळे हा मुद्दा आणखी चर्चेचा विषय ठरला आहे.





