कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला मानाचा मुकुट; महेंद्रजी तामोरे यांचा जीवनगौरव सन्मानाने गौरव

कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला मानाचा मुकुट; महेंद्रजी तामोरे यांचा जीवनगौरव सन्मानाने गौरव
४० वर्षांच्या प्रेरणादायी सेवेचा सन्मान
आकुर्डी | प्रतिनिधी
बजाज ऑटो, आकुर्डी येथे तब्बल चार दशके कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने सेवा बजावणारे माननीय महेंद्रजी तामोरे यांना डायनामिक इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या वतीने भव्य “जीवनगौरव सन्मान” प्रदान करून गौरविण्यात आले.
श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहू यांच्या पावन भूमीत वसलेल्या बजाज ऑटो कंपनीत महेंद्रजी तामोरे यांनी आपल्या ४० वर्षांच्या सेवाकाळात शिस्त, कार्यनिष्ठा, वेळेचे भान आणि उत्कृष्ट कार्यसंस्कृतीचा आदर्श निर्माण केला. आपल्या शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभावाने त्यांनी अधिकारी वर्ग, सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात संत परंपरेचा गौरव जपत संत तुकाराम महाराजांची पगडी, उपरणे, तुळशीहार, संत तुकाराम महाराजांची मूर्ती तसेच गौरव सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कर्तृत्वपूर्ण सेवेला मानवंदना दिली.
महेंद्रजी तामोरे यांचा सेवाप्रवास हा केवळ नोकरीचा इतिहास नसून कर्तव्य, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि मूल्याधिष्ठित कार्यसंस्कृतीचा प्रेरणादायी आदर्श आहे. आपल्या कामातील शिस्तीसोबतच फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबाबत असलेली त्यांची बांधिलकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

यावेळी बजाज ऑटो कंपनीचे अधिकारी वर्ग, डायनामिक इंडिया प्रा. लिमिटेडचे अधिकारी, डीआरएल ग्रुपचे अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महेंद्रजी तामोरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
✨ “४० वर्षांची प्रेरणादायी कारकीर्द…
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचा सुवर्णमयी प्रवास!” ✨
महेंद्रजी तामोरे यांना प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून निष्ठा, परिश्रम, मूल्ये आणि कार्यसंस्कृतीचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
– वंदे भारत न्यूज एक्सप्रेस 🇮🇳
📞 8308385789
🌐 www.vandebharatnewsexpress.com





