अजितदादा पवार जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना नवीन कार्डांचे वाटप; सिद्धीविनायकनगरीत सामाजिक उपक्रम
स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना नवीन कार्डांचे वाटप
निगडीतील सिद्धीविनायकनगरीत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड वितरण करण्यात आले
देहूरोड, दि. २२ जुलै : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धीविनायकनगरी परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. मावळचे आमदार सुनील शेळके, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे तसेच देहूरोड शहराध्यक्ष ॲड. प्रविण झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांना केवळ १६० रुपयांत नवीन ज्येष्ठ नागरिक कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस ॲड. कृष्णा दाभोळे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ह.भ.प. विजय जगताप, उपाध्यक्ष तानाजी काळभोर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर ढगे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना ॲड. कृष्णा दाभोळे आणि तानाजी काळभोर यांनी स्व. अजितदादा पवार यांनी पुणे जिल्हा आणि विशेषतः मावळ तालुक्यासाठी दिलेल्या विकासनिधीचा उल्लेख केला. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून गाव, वाडी आणि वस्त्यांपर्यंत विकासकामे पोहोचल्याने मावळ तालुक्याचा कायापालट झाल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत मनोहर खानझोडे, चंद्रकांत ढोले, अरविंद पाटील, संजय लाड, पोपट लोंढे, काकडे, माने, बन्सी रोडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांना नवीन ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब आवंढे, चनाप्पा हुक्केरी, मंगल तानाजी काळभोर, रूपाली सुधीर ढगे आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप चंद्रकांत ढोले यांनी आभार प्रदर्शनाने केला.





