पुणे / पीसीएमसीवाणिज्य

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘तेजस्विनी ड्रायफूड्स’चा दर्जेदार ड्रायफ्रूट्सला उत्तम प्रतिसाद; १५ वर्षांचा विश्वास, परवडणारे दर


पिंपरी-चिंचवडमध्ये ‘तेजस्विनी ड्रायफूड्स’च्या दर्जेदार ड्रायफ्रूट्सला उत्तम प्रतिसाद; १५ वर्षांचा विश्वास, परवडणारे दर

पिंपरी-चिंचवडमध्ये दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात ड्रायफ्रूट्स उपलब्ध करून देणारे ‘तेजस्विनी ड्रायफूड्स’ हे नाव गेल्या १५ वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन करत आहे. काळेवाडी येथील श्यामराव घेरडे आणि त्यांच्या पत्नी पूनम घेरडे यांनी प्रामाणिकपणे उभा केलेला हा होलसेल ड्रायफ्रूट व्यवसाय सध्या पिंपरी-चिंचवड परिसरात लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः आयटी पार्क परिसरातील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे घेरडे यांनी सांगितले.

आरोग्यासाठी उपयुक्त आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुके, खारीक, खजूर यांसह विविध दर्जेदार ड्रायफ्रूट्स येथे योग्य दरात उपलब्ध आहेत. काजू आणि बदाम ५०० ग्रॅमसाठी ४६० रुपये, लाल व काळे मनुके ५०० ग्रॅमसाठी २६० रुपये, पिवळी व काळी खारीक ५०० ग्रॅमसाठी १५० रुपये, अक्रोड व पिस्ता २५० ग्रॅमसाठी ३५० रुपये, अंजीर २५० ग्रॅमसाठी ३५० रुपये, काळी खजूर ५०० ग्रॅमसाठी १०० रुपये तर सुट्टी काळी खजूर १७० रुपये दराने उपलब्ध आहे. याशिवाय डिंक, केळी चिप्स, बटाटा चिप्स, चिलिमिली, खोबरे आदी पदार्थही विक्रीस आहेत.

जय मल्हार नगर, कॉलनी क्र. ०५, राहाटणी फाटा बीआरटी बसस्टॉपजवळ, थेरगाव येथे ‘तेजस्विनी ड्रायफूड्स’चे दुकान आहे. ग्राहकांना Google Pay आणि PhonePe सारख्या डिजिटल पेमेंट सुविधाही उपलब्ध आहेत. ऑर्डरसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्याम घेरडे (९९७०६४०८१६ / ९७६५०१०६०५) तसेच पूनम घेरडे (९८६०३९७१६७) यांच्याशी संपर्क साधता येतो. व्हॉट्सअॅपवर ऑर्डर आणि लोकेशन पाठवण्याची सोयही आहे.

“आरोग्यम् धनसंपदा” या तत्वावर आधारित व्यवसाय करत असल्याचे घेरडे दांपत्य सांगते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर स्वस्त दरात दर्जेदार ड्रायफ्रूट्स देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, उधारी बंद असून सर्व व्यवहार रोख किंवा डिजिटल पद्धतीनेच केले जातात. तसेच बाजारातील चढ-उतारानुसार दर दोन ते तीन दिवसांनी बदलू शकतात, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ग्राहकांनी मालाची गुणवत्ता तपासून घ्यावी, कारण एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडकरांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी नियमित ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा आणि स्थानिक व्यवसायाला सहकार्य करावे, असे आवाहन तेजस्विनी ड्रायफूड्सतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *